आंबेडकरांनी हिंदू एकतेसाठी आयुष्य वेचले -मोहन भागवत

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू समाजाला एकसंध ठेवण्यासाठी आपले आयुष्य वेचले.  लहानपणी अनेक समस्यांचा सामना करावा लागल्यानंतरही त्यांनी सामाजिक ऐक्य आणि राष्ट्रीय विकासासाठी ते वचनबद्ध राहिले, असे विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. कानपूरच्या करावालो नगर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाचे उद्धाटन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले.

सामाजिक एकता आणि विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान हे सर्वांसाठी प्रेरणादायी आहे असेही भागवत म्हणाले. दरम्यान, डॉ. आंबेडकर आणि आरएसएसचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्यात समानता होती. दोघांनीही समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले असेही ते म्हणाले.