प्रेरणेच्या पायवाटा – प्रेरणेची पालवी..

>> डॉ. अनिल कुलकर्णी

एचआयव्हीएड्सग्रस्त अनाथ बालकांच्या संगोपनाकरिता मंगलताई शहा पंढरपूरमध्ये ‘पालवी’ नावाची संस्था चालवतात. हीच खरी प्रेरणेची पायवाट.

एचआयव्ही एड्‌सग्रस्त अनाथ बालकांच्या संगोपनाकरिता मंगलताई हा यांनी 2001 मध्ये पंढरपूरमध्ये पालवी’ नावाची संस्था स्थापन केली दोन मुलांच्या प्रवेशापासून सुरू झालेली संस्था जाता बहुअंगांनी विस्तारली आहे. संस्थेने या मुलांकरिता स्वतःची लाला गोशाळा सुरू केली आहे. एड्सग्रस्त अनाथ बालकांबरोबरच अत्याचार पीडित कुमारी माता मनोरुग्ण माता विवंचनेने पीडित स्त्रिया यांचा तात्पुरता किंवा कायमस्वरूपी सांभाळ केला जाती. मरित्यक्त्या, विधवा, वृद्ध, मनोरूग्ण यांना आधार दिला हाती. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी शिलाईकाम, लोतीकाम, प्लंबिंग इत्यादी कामे त्यांना शिकवली जातात. पाखेरीजही संस्थेतर्फे वंचितांकरिता अनेक प्रकल्प बदले जातात. मंगलताईनी प्रमा-हिरा प्रतिष्ठानच्चा अंतर्गत ‘पालवी’ या संस्थेची स्थापना केली ही संस्था सास्त अनाथ मुलांचा सांभाळ करते. म्हणून गोशाळा गुरू केली. मुले निरोगी राहावीत म्हणून योगोपचार सुरू केले. या मुलांना शाळांमध्ये प्रवेश मिळवून दिला. प्रभा हिरा प्रतिष्ठानमार्फत आठ प्रकल्प राबवले जातात.

पालवी संगोपन प्रकल्प ‘पालवी’ हा एचआयशीसह जगणाऱ्या अनाथ बालकांचा संगोपन प्रकल्प आहे. समाजाच्या जात्यंतिक गरजेतून एचआयव्हीवामित बालकांसाठी महाराष्ट्रातील हा पहिला प्रकरण पंढरपूर येथे 2001 सारी सुरू झाला.

मालवी ज्ञानमंदिर प्रकरम पालवी प्रकल्पामध्ये बालकांना अंगणवाडी ते दहावीपर्यंतचे शिक्षण दिले जाते. गोशाळा प्रकल्प बालकांच्या सकस आहारासाठी गोशाळा सुरू केली असून त्यात सध्या जात गायी आहेत स्वयंत्तहायता प्रकल्प या प्रकल्पांतर्गत संस्थेतील मुलांना प्रशिक्षित त्तींकडून प्रशिक्षण देऊन टाकाऊतून टिकाऊ वस्तू, साकांची पायपुसमी, कॅरी बॅग्स, विविध पर्सेस बनवाया जातात. महिलांना स्वावलंबी बनासाठी शिलाईकाम, होतकाम, पलंबिंग, कागदकाम शिकवले जाते.

हिरकणी प्रकत्म या प्रकल्पामध्ये अत्याचारपीडित कुनारी माता, मनोरुम्न माता, विवंचनेने पीडित स्त्रिया यांचा तात्पुरता किंवा कायमस्वरूपी सांभाळ केला जातो ‘गरज त्याला आजरा’ या पद्धतीने परित्यक्त्या, विधवा, वृद्ध मनोरुग्ण यांना आधार दिला जातो.

पालवी परीसस्पर्श समाजामधील कचरावेचक लहान मुलं सुसंस्कारित नागरिक व्हावीत म्हणून त्यांना हौशानिया प्रयाहामध्ये आमष्ण्यासाठी, ही बालके व्यसनांमध्ये अडकूनयेत यासाठी पालवीचे काम सुरू आहे.

पालयी संकुर, पुगे शाखा वेश्यावस्तीतील बालकांकरिता संस्कार वर्ग, अनाथ, गरजू महिलांकरिता विविध प्रशिक्षण वर्ग सुरू केले आहेत तसेच सरकारी रुग्णालयांमध्ये पेशंट भरती झाल्यानंतर तो जर अनाथ असेल तर त्याची व्यवस्था एखाद्या संस्थेमनी करणे, त्याची सर्व व्यवस्था होईपर्यंत त्याला राहण्याकरिता पालवीमार्फत पुणे येथीत अंकुन शाखेमध्ये ठेवले जाते. त्यांची तेथे चार ते पंधरा दिवस व्यवस्था कंसन त्यांना योग्य त्या संस्थेमध्ये पोहोचवले जाते.

पालयी बावमसेवा- पंढरपूरसारख्या तीर्थक्षेत्री अनेक वंचित रस्त्यावर बसून येमान्य जागान्याकडे अवाकरिता बाचना करत असतात. मंगलताईनी पुढाकार घेऊन रेल्वे स्टेशनवर बसणाऱ्या वाचकांना एआरटी सेंटर, उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर येथे रोज सकस आहार, गरम खिचडी वाटप गुरू केले आहे. तसेच श्री वेठमा भोजनाचे वर्षभरापूर्वी स्वप्न साकार झाले.

ताईंना वाचनाची प्रचंड आवड आहे. महिलांनी महिलांसाठी चालवलेले ‘शब्द-शिल्प’ वाचनालयात 1000 पुस्तकांचा खजिना आहे, तर ताईची वैयक्तिक ग्रंथसंपदा एक हजाराच्या आसपास आहे. ताईगा आतापर्यंत तीनशेहून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. अलीकडेच मलोबल महासनेने जैन साता महिला पुरस्कार दिला आहे.

[email protected]