स्टुडंट व्हिसा शुल्कात दुप्पट वाढ; ऑस्ट्रेलियाचा बाहेरच्या विद्यार्थ्यांना जबर झटका

ऑस्ट्रेलियात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा झटका बसला आहे. ऑस्ट्रेलियाने विद्यार्थी व्हिसा नियमात मोठे बदल केलेत. त्यानुसार ऑस्ट्रेलियाने इतर देशांतून शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे व्हिसा शुल्क दुप्पट केलेय. वाढीव शुल्क 1 जुलैपासून लागू झाले. हे शुल्क 710 ऑस्ट्रेलियन डॉलरवरून 1600 डॉलर करण्यात आलेय. म्हणजे सुमारे 39 हजार रुपयांवरून सुमारे 89000 रुपये वाढले आहे. तसेच व्हिजिटर्स व्हिसा आणि अस्थायी पदवी व्हिसावाले विद्यार्थी आता स्टुडंड व्हिसासाठी अर्ज करू शकत नाही. ऑस्ट्रेलियाचे गृहमंत्री क्लेयर ओ नील यांनी स्टुडंट व्हिसाच्या बदलत्या नियमांमुळे आंतरराष्ट्रीय शिक्षण प्रणालीत अखंडता आणण्यास मदत होईल, असे ऑस्ट्रेलियाकडून सांगण्यात आले.

30 सप्टेंबर 2023 पर्यंत ऑस्ट्रेलियात स्थलांतरित झालेल्या लोकांची संख्या 60 टक्क्यांनी वाढून 5 लाख 48 हजार 800 इतकी झाली.

स्टुडंट व्हिसा शुल्कात वाढ झाल्याने ऑस्ट्रेलियात शिकायला जाणे अमेरिका, कॅनडापेक्षा महाग झाले. अमेरिकेत स्टुडंट व्हिसा शुल्क 185 अमेरिकी डॉलर म्हणजे रुपये 5440 तर कॅनडामध्ये हेच शुल्क 150 डॉलर म्हणजे 9156 रुपये आहे.