चारचाकी वाहने चालवणाऱयांना आता वाहनांना फास्टॅग लावावाच लागणार आहे. कारण 1 एप्रिलपासून सर्व वाहनांना फास्टॅग अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य शासनाने आज घेतला. फास्टॅग नसेल तर त्या वाहनांना दुप्पट टोल भरावा लागणार आहे. फास्टॅग चालू नसेल किंवा फास्टॅगशिवाय वाहनाने फास्टॅगच्या मार्गिकेत प्रवेश केल्यासही दुप्पट पथकर भरावा लागणार आहे.