स्पेनमध्ये आढळला 36 फुटांचा मासा

स्पेनमधील समुद्रकिनारी एक खूपच दुर्मिळ मासा डुम्सडे फिश म्हणजे संकटाचा मासा दिसला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हा मासा जवळपास 36 फूट लांब आहे. याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून या माशाला समुद्रात पाठवण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु तोपर्यंत हा मासा मृत झाला होता. समुद्रकिनारी हा मासा आढळल्याने अनेक जण कमेंट करत आहेत. या माशाला संकटाचा मासा म्हणून ओळखले जात असले तरी हे केवळ योगायोगाने समुद्रकिनारी आला आहे, असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे.