HMPV व्हायरसला घाबरून जाऊ नका, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन

HMPV व्हायरस फार धोकादायक नाही, या व्हायरसला घाबरून जाऊ नका असे आवाहन वैद्यकीय शिक्षम मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. तसेच HMPV व्हायरसच्या पार्श्वभुमीवर राज्यातील शासकी महाविद्याल रुग्णालयांचा आढावाही घेतला गेला असेही मुश्रीफ म्हणाले.

आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत हसन मुश्रीफ म्हणाले की, HMPV हा व्हायरस 2001 नेदरलँडमध्ये पहिल्यांदा सापडला होता. राज्यात या विषाणूचे पाच रुग्ण आढळले असून त्यापैकी एक रुग्ण बरा झाला आहे. या रुग्णाला डिस्चार्जही देण्यात आला आहे. हा व्हायरस धोकादायक नाही हे सिद्ध झालेले आहे. ज्यांना सर्दी, खोकला, श्वसनाचे आजार असलेल्यांना, 5-10 वर्षाच्या मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना या आजाराचा जास्त धोका आहे असे मुश्रीफ म्हणाले.

तसेच यापूर्वी आपण कोरोनोसारख्या आजारांना तोंड दिले आहे. आपल्या देशाच्या नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे. त्यामुळे या व्हायरसला घाबरून जाण्याचे कारण नाही. शासकीय महाविद्यालयात रुग्णालये आहेत. या रुग्णालयात सध्या गर्दी वाढली आहे. रुग्णांना विलगीकरण करण्याची गरज आहे. मी आजच सर्व अधिकाऱ्यांची व्हिडीओ कॉन्फरसद्वारे आढावा घेतला आहे असेही मुश्रीफ म्हणाले.