US presidential election 2024 – डोनाल्ड ट्रम्प विजयी, शेअर बाजाराची सलामी; 10 शेअर बनले रॉकेट

अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले आहेत. ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार आणि विद्यमान उपाध्यक्षा कमला हॅरिस यांचा पराभव केला. ट्रम्प यांना 277 इलेक्टोरल मतं मिळाली, तर हॅरिस यांना 236 इलेक्टोरल मतं मिळाली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाचा परिणाम हिंदुस्थानच्या शेअर बाजारावरही झाला आहे. ट्रम्प यांनी विजयी आघाडी घेतात शेअर बाजारात तेजी दिसून आली.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाची घोषणा होताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 800 अंक, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 250 अंक उसळला. यामुळे अनेक शेअरमध्ये तेजी दिसून आली. विशेष म्हणजे सकाळी बाजार उघडला तेव्हाही तेजी दिसून आली होती. मात्र जसा ट्रम्प यांचा विजय नक्की होत गेला तसा बाजार आणखी वधारला. बीएसईवरील लार्जकॅपच्या 30 शेअरपैकी 22 शेअरमध्ये तेजी दिसून आली.

US presidential election 2024 – डोनाल्ड ट्रम्प पुन्हा होणार अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष, बहुमताचा आकडा पार!

आज BEL कंपनी शेअर 4.52 टक्के, AADANIENT कंपनीचा शेअर 4.15 टक्के, TCS कंपनीचा शेअर 3.14 टक्के, TECHM कंपनीचा शेअर 3.71 टक्के, HCLTECH कंपनीचा शेअर 3.69 टक्के वाढला.

Dixon Share कंपनीचा शेअर 4.76 टक्के,, RVNL कंपनीचा शेअर 3.59 टक्के, IRCTC कंपनीचा शेअर 3.44 टक्के, CCL कंपनीचा शेअर 8.97 टक्के, Kaynes Share कंपनीचा शेअर 6.14 टक्के आणि और NwtWeb कंपनीचा शेअर 5.08 टक्के वाढला.

तर INDUSINDBK कंपनीचा शेअर 1.47 टक्के, TITAN कंपनीचा शेअर 1.40 टक्के, HDFCLIFE कंपनीचा शेअर 1.07 टक्के, SBILIFE कंपनीचा शेअर 1.02 टक्के, CIPLA 0.73 टक्के पडला.