तिसरे महायुद्ध रोखणार, डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली शपथ

आपण तिसरे महायुद्ध रोखणार अशी शपथ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली आहे. तसेच सीमेवरील घुसखोरीही थांबवणार असेही ट्रम्प म्हणाले. गेल्या वर्षी निवडणुकीपूर्वी जी काही आश्वासनं दिली होती ती सगळी पूर्ण करणार असेही ट्रम्प म्हणाले.

ट्रम्प यांची राष्ट्राध्यक्ष म्हणून आज शपथविधी होणार आहे. त्यापूर्वी मेक अमेरिका ग्रेट अगेन कार्यक्रमात ट्रम्प यांनी संबोधित केले. तिसरे महायुद्ध रोखणार, सीमेवरील घुसखोरी थांबवणार अशी शपथच ट्रम्प यांनी घेतली. शपथ घेतल्यानंतर पहिला दिवस, पहिला आठवडा आणि पहिले 100 दिवसे इतके सुंदर असतील की असे दिवस कुठल्याच राष्ट्राध्यक्षाच्या काळात पाहिले नसतील असेही ट्रम्प म्हणाले. तसेच मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यानी जे जे निर्णय घेतले होते ते निर्णय रद्द करणार असेही ट्रम्प म्हणाले.