
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी चिनी वस्तूंवर वाढीव टॅरिफ लागू केला असून आता चिनी वस्तूंवर 104 टक्के टॅरिफ आजापासून लागू होणार आहे. तसेच हिंदुस्थानवरही 26 टक्के टॅरिफ लागू होणार आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाची आजपासून अंमलबजावणी होणार असल्याने जगभरात अस्वस्थतेचे वातावरण आहे. या मुळे जागतिक बाजारपेठा हादरल्या आहेत आणि मंदीची भीती अधिक गडद झाली आहे.ट्रम्प भूमिकेवर ठाम आहेत,तर बीजिंगने मागे हटण्यास नकार दिला आहे. त्यामुळे जगात टॅरिफ वॉर सुरू होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. आजपासून याची अंमलबजावणी होणार असल्याने जागतिक अर्थव्यवस्थावर संकट ओढवले आहे.
अमेरिकन बाजारपेठेत घसरण झाल्याने ट्रम्प यांनी असा दावा केला की या शुल्कांमुळे दररोज जवळजवळ 2 अब्ज डॉलर्स उत्पन्न होत आहे.अनेक कंपन्यांना अमेरिकेत स्थलांतरित होण्यास प्रोत्साहित करून ते अमेरिकन उत्पादन पुनरुज्जीवित करतील असा दावा त्यांनी केला. तसेच त्यांनी याआधीच्या व्यापार धोरणांवर तीव्र टीका केली आणि पुढील महिन्यापासून लागू होणाऱ्या औषधनिर्माण आणि कमी मूल्याच्या चिनी आयातींवर अतिरिक्त शुल्क आकारण्याच्या आदेशांवर स्वाक्षरी केली.
ट्रम्प यांना प्रत्युत्तर देत बिजींगनेही या मुद्द्यावर शेवटपर्यंत लढण्याचा निर्धआर व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी अमेरिकवर अतिरिक्त शुल्क लादण्याचा निर्णय ठाम ठेवला आङे. जागतिक घडामोडींमुळे सलग पाचव्या दिवशी युआन कमकुवतझाला आहे. डॉलरच्या तुलनेत विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचले आहे. यामुळे बाजारपेठेत मोठी विक्री झाली आहे आणि आशियातील निर्देशांक बुधवारी पुन्हा एकदा घसरले आहेत. हाँगकाँगमध्ये 3% पेक्षा जास्त घसरण झाली आणि जपानचा निक्केई 2.7% घसरला. दक्षिण कोरियाच्या वॉनसह या प्रदेशातील चलनांनाही फटका बसला. चीनने म्हटले की त्यांची अर्थव्यवस्था दबाव सहन करू शकते. त्यामुळे व्यापर युद्ध तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जागतिक अस्थिरतेमुळे तेलाच्या किमतीही घसरल्या आहेत. एप्रिल 2021 नंतर पहिल्यांदाच क्रूड तेलाचे दर प्रति बॅरल 60 डॉलर्सपेक्षा कमी झाले.