बायडन प्रशासनाने गाझामध्ये मंजूर केलेला 432 कोटी निधीवर ट्रम्प सरकारने बंदी आणली आहे. बायडन प्रशासनाने गाझामध्ये कंडोम वितरणासाठी हा निधी मंजूर केला, असा आरोप व्हाईट हाऊसने केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच अमेरिकेकडून होणाऱ्या सर्व परदेशी मदतीवर रोख लावली होती. यानंतर व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी पत्रकार परिषद घेत सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले.
🚨BREAKING: DOGE and OMB (Office of Management and Budget) found that the Biden admin was about to send $37M to the World Health Organization and $50M to fund condoms for Gaza. pic.twitter.com/u0gtiLQbwX
— Autism Capital 🧩 (@AutismCapital) January 28, 2025
गेल्या आठवड्यात एलन मस्क यांचा सरकारी कार्यक्षम विभाग (DOGE ) आणि बजेट कार्यालय (OMB ) गाझामध्ये मंजूर झालेल्या निधीची चौकशी करत आहेत, अशी माहिती लेविट यांनी पत्रकार परिषदेत दिली. यानंतरच कंडोम वाटपासाठी 3.7 कोटी डॉलर एवढी मोठी रक्कम मंजूर करण्यात आल्याचे उघड झाले आहे. यादरम्यान, बायडन प्रशासनाचे सहाय्यक सचिव अँड्र्यूज मिलर यांनी हा दावा खोटा असल्याचे सांगितले. ही संपूर्ण रक्कम स्त्रीरोग आणि इतर गोष्टींसाठी मंजूर केली जाऊ शकते, असे मिलर यांनी सांगितले.
Wonder what the condoms could be used for? 🤔 https://t.co/9woFI8R1SI pic.twitter.com/gr650UKR9R
— Autism Capital 🧩 (@AutismCapital) January 28, 2025
व्हाईट हाऊसच्या या वक्तव्यानंतर एलन मस्क यांनी हमासच्या या कारवाईचा अहवाल शेअर केला. यासंदर्भात त्यांनी एक पोस्ट देखील शेअर केली आहे. यामध्ये जेरुसलेमची पोस्ट शेअर करत मला सांगा की सर्व कंडोम मॅग्नम का ऑर्डर केले गेले? असा प्रश्न उपस्थित केला आहे. जेरूसलेने दिलेल्या पोस्टनुसार गाझामध्ये हमास कंडोमचा शस्त्रासारखा वापर करत आहे. 2017 मध्ये हमासने धोकादायक वायूने कंडोम भरण्यास सुरुवात केली आणि ते इस्रायलच्या दक्षिणेकडील भागात सोडले होते.