ट्रम्प यांच्या निर्णयाचा दणका! 18 हजार घुसखोर भारतीयांची यादी तयार, आता 1700 भारतीयांना अटक

अमेरिकेची सुत्रे हाती घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांचा फटका हिंदुस्थानींना बसत आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेत अवैधरित्या राहणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले होते. त्यांच्या आदेशानुसार याची अंमलबाजावणी करण्यात आली. अवैध रहिवासी आणि घुसखोरांचा शोध घेण्यासाठी मोहिमही राबवण्यात आली होती. आता ट्रम्प यांनी 18 हजार अवैध भारतीयांची हद्दपारीसाठीची यादी तयार केली आहे. तसेच 1700 अवैध स्थलांतरीत भारतीयांना अटकही करण्यात आली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्ध घेतलेल्या निर्णयाचा परिणाम अमेरिकेत दिसून येत आहे. ट्रम्प यांनी 11 दिवसांत 25 हजाराहून अधिक अवैध स्थलांतरितांना ताब्यात घेतले आहे. ट्रम्प यांच्या आईस टीमकडून (इमिग्रेशन आणि कस्टम एन्फोर्समेंट) 12 राज्यांमध्ये छापे टाकण्यात आले. सर्वाधिक छापे रिपब्लिकन राज्यांमध्ये टाकण्यात आले आहेत. यापैकी 1700 अवैध स्थलांतरित भारतीयांना अटकही करण्यात आली आहे.

याआधी 18 हजार अवैध अनिवासी भारतीयांची हद्दपारीसाठी निवड करण्यात आली आहे. ट्रम्प यांनी सत्ता हाती घेताच मेक्सिको सीमेवरून घुसखोरीच्या घटनांमध्ये 64 टक्के घट झाली आहे. ट्रम्प सरकारच्या ताज्या कारवाईत अटकेत असलेल्या अवैध स्थलांतरितांच्या संख्येत भारतीय चौथ्या क्रमांकावर आहेत.