
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या टॅरिफ धोरणामुळे चर्चेत आहेत. तसेच त्यांच्या या धोरणाचा जगाला फटका बसला आहे. अनेक देशातील शेअर बाजारात घसरण होत आहे. त्यातच आता जगातील आर्थिक वातावरण अस्थिर करणारी घोषणा ट्रम्प यांनी केली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा अमेरिकेच टॅरिफ धोरण आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबतच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
जगातील सर्व देश अमेरिकेची फसवणूक करत आहेत. त्यामुळे आता संपूर्ण जगावर टॅरिफ लावण्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. येत्या काळात आम्ही सर्व देशांवर टॅरिफ लावणार आहोत. जशास तसे धोरणाप्रमाणे टॅरिफ लावण्याची घोषणा ट्रम्प यांनी याआधी केली होती. मात्र, आता सर्व जगावरच टॅरिफ लावण्याचे वक्तव्य टॅम्प यांनी केले आहे. जे देश अमेरिकेवर टॅरिफ लावतात त्यांच्यावर टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती. अमेरिकन वस्तू आणि सेवांवर जे देश आयात शुल्क आकारतात किंवा अमेरिकेचा व्यापार ज्या देशांसोबत असंतुलित आहेत, त्यांच्या विरुद्ध टॅरिफ आकारणार असल्याची घोषणा ट्रम्प यांनी केली होती. आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेनं सर्वांना धक्का दिला आहे.
आम्हाला असं फसवण्यात आलं आहे की इतिहासात कुठल्याही देशानं कुणाला फसवलं नसेल. आम्ही जगासोबत चांगला व्यवहार करायचा प्रयत्न करत आहोत मात्र ही देशासाठी मोठी रक्कम आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, आम्ही सर्व देशांना टॅरिफ लावण्याची सुरुवात करणार आहोत, त्यासाठी काय होतंय ते पाहूयात. आपण 10 किंवा 15 देशांबाबत नाही तर सर्व देशांबाबत बोलतोय, टॅरिफमध्ये कोणतीही कपात नाही, असं ट्रम्प म्हणाले. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानवरही परस्पर शुल्क लादण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे हिंदुस्थानकडून अमेरिकेसोबत व्यापारी करार करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यात यश आल्यास हिंदुस्थानला टॅरिफचा मोठा फटका बसणार नाही.