घाबरलेल्या चीनने चुकीचं पाऊल उचललं, अमेरिकेवर 34 टक्के टॅरिफ लावल्याने ट्रम्प संतापले

अमेरिका आणि चीनमधील आता टॅरिफ युद्ध पेटलं आहे. अमेरिकेने लादलेल्या टॅरिफला प्रत्युत्तर म्हणून चीनने अमेरिकन उत्पादनांवर 34 टक्के टॅरिफ लादला आहे. यावरच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्रुथ सोशलवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, “चीन घाबरला आहे आणि तो चुकीची पावले उचलत आहे.”

दरम्यान, 2 एप्रिल 2025 हा दिवस अमेरिकेचा मुक्ती दिन म्हणून घोषित करताना डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थान आणि चीनसह अनेक देशांवर नवीन टॅरिफ लादले होते. याचा जगभरातील शेअर बाजारांना फटका. हिंदुस्थानच नाही तर अमेरिकेच्या शेअर बाजारातही सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली. यामुळे गुंतवणूकदारांचे अब्जावधी रुपयांचे नुकसान झाले आहे.