ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळय़ात मस्क यांचा नाझी सॅल्यूट, सोशल मीडियावरून संताप

डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळय़ातील एलॉन मस्क यांचा एक व्हिडीओ मोठय़ा प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये ते हिटलरप्रमाणे एक हात एका बाजूने उंचावून नाझी सॅल्यूट मारत असल्याचा दावा नेटकऱ्यांनी केला आहे. ट्रम्प यांना मिळालेला विजय सामान्य नसून, तुम्ही हे सर्वकाही घडवून आणले त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो, असे मस्क यांनी सांगितले. मस्क यांनी त्यांचा उजवा हात छातीजवळ घेतला आणि नंतर तो बाहेर काढला. या कृतीचा दाखला देत ते कुणाला तरी सॅल्यूट करत असल्याची टीका मस्क यांच्यावर केली जात आहे.

मस्क यांच्या या सॅल्यूटवरून त्यांच्यावर टीका केली जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांनी मस्क यांची तुलना हिटलर आणि नाझी लोकांशी केली. याला प्रत्युत्तर देताना मस्क यांनी सगळेच हिटलर असल्याचे म्हटले. तसेच ही टीका जुनी झाली असल्याचेही त्यांनी सांगितले. तर अनेकांनी मस्क यांचा बचाव करताना जुन्या घटनांचे पह्टो व्हायरल केले.