अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी बहुमताचा आकडा पार केला आहे. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीमध्ये ट्रम्प यांनी कमला हॅरिस यांच्यावर विजयी आघाडी मिळवली आहे. त्यांचा विजय जवळपास निश्चित झाला असून ते पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र हाती घेतील. ट्रम्प हे अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष असतील. ‘फॉक्स न्यूज’ने याबाबत वृत्त दिले आहे.
राष्ट्राध्यक्षपदासाठी 270 इलेक्टोरल मतांची आवश्यकता असते. डोनाल्ड ट्रम्प सध्या आघाडीवर असून त्यांची 270 हा बहुमताचा आकडा पार केला असून सध्या त्यांना 277 इलेक्टोरल मतं मिळाली आहेत. तर कमला हॅरिस यांना 226 इलेक्टोरल मतं मिळाली आहेत.
#USAElection2024 | Fox News projects Donald Trump wins the presidential election 2024 pic.twitter.com/IJz6OU7bi7
— ANI (@ANI) November 6, 2024