
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यातील भेटीनंतर काही मिनिटांतच दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाल्याचं पाहायला मिळालं आहे. झेलेन्स्की यांनी शुक्रवारी व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी रशिया- युक्रेनमध्ये युद्धविराम आणि अमेरिकेसाठी खनिज करारावर चर्चा केली. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया-युक्रेन युद्धावर पुन्हा एकदा मोठं विधान करत झेलेन्स्की यांना म्हणाले की, ”युक्रेनला रशियासोबत युद्धविरामाबाबत तडजोड करावी लागेल. हे युद्ध आता चुकीच्या दिशेने जात आहे.”
मात्र झेलेन्स्की यांनी युद्धविरामाच्या चर्चेला विरोध केला आणि स्पष्ट शब्दात सांगितले की, आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये कॅमेरासमोरच वादविवाद झाल्याचं पाहायला मिळालं. ज्याचा व्हिडीओही समोर आला आहे. यावेळी डोनाल्ड ट्रम्प झेलेन्स्की यांना म्हणाले की, ”तुम्ही लाखो लोकांच्या जीवनाशी जुगार खेळत आहात. तुम्ही तिसऱ्या महायुद्धाचा जुगार खेळत आहात. तुम्ही जे करत आहात ते देशाचा खूप अपमान करणारे आहे. तुमचा देश मोठ्या संकटात आहे. तुम्ही हे युद्ध जिंकताना दिसत नाही. तुम्हाला यातून बाहेर पडण्याची खूप चांगली संधी आहे.”
Trump – Zelensky resmen tartışmış..
Putin keyifle izliyordur.Al işte örnek magazin figürüne bir ülkeyi teslim edersen onun bunun elinde maymun olursun.
Rabbim ülkemizi korumuş… pic.twitter.com/VbOH20yo6X
— Seda ARSLAN (@sdarslnn) February 28, 2025