अमेरिकेतील 7 लाख हिंदुस्थानींची वाढली चिंता; अवैध स्थलांतरीतांना शोधण्यासाठी कारवाई सुरू

डोनाल्ड ट्रम यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची धुरा सांभाळ्यानंतर आता त्यांनी महत्त्वाचे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी संकेत दिल्याप्रमाणे अमेरिक्त अवैधरित्या राहणाऱ्या स्थलांतरीतांवर कारवाई करण्यात येणार आहे. अवैध स्थलांतरीतांना शोधण्यासाठी प्रशासनाने न्यू यॉर्क आणि न्यू जर्सी येथील गुरुद्वारामध्ये शोध मोहिम हाती घेतली आहे. त्यांच्या या कारवाईमुळे अमेरिकेत असणाऱ्या 7लाख हिंदुस्थानींची चिंता वाढली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी अवैध स्थलांतरितांविरुद्ध मोठी कारवाई सुरू केली. ट्रम्प प्रशासनाने 6 दिवसांत अमेरिकेत अवैधरित्या राहणाऱ्या शेकडो परदेशी लोकांना हद्दपार केले आहे. सरकारी अधिकारी अवैध स्थलांतरितांना शोधण्यासाठी गुरुद्वारांमध्ये शोदमोहिम रोबवत आहेत. होमलँड सिक्युरिटीच्या अधिकाऱ्यांनी न्यू यॉर्क आणि न्यू जर्सीमधील गुरुद्वारांमधअयो शोध मोहिम सुरू केली. याबाबत काही शीख संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. शीख फुटीरतावादी तसेच काही कागदपत्रे नसलेले स्थलांतरित न्यू यॉर्क आणि न्यू जर्सीमधील काही गुरुद्वारांचा आश्रय घेत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

होमलँड सिक्युरिटी सेक्रेटरी बेंजामिन हफमन यांनी इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट आणि कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शन अंमलबजावणी कारवाई टप्प्याटप्प्याने करण्याचे निर्देश जारी केले. सरकारने मार्गदर्शक तत्त्वे रद्द केली आहेत. ही कारवाई सीबीपी आणि आयसीई अधिकाऱ्यांना आमचे इमिग्रेशन कायदे लागू करण्यास आणि आमच्या देशात बेकायदेशीरपणे आलेल्या खुनी आणि बलात्काऱ्यांसह गुन्हेगार परदेशी लोकांना पकडण्यास सक्षम करते, असे होमलँड सिक्युरिटीच्या प्रवक्त्याने सांगितले. गुन्हेगारांना अटक टाळण्यासाठी आता अमेरिकेच्या शाळा आणि चर्चमध्ये लपता येणार नाही. ट्रम्प प्रशासन आपल्या धाडसी अधिकाऱ्यांचे हात बांधणार नाही आणि त्याऐवजी अशा प्रकरणांमध्ये अधिकारी त्यांच्या विवेकबुद्धीचा वापर करतील असा विश्वास आहे, असेही अधिकाऱ्याने सांगितले. या कारवाईमुळे अमिरिकेत राहणाऱ्या हिंदुस्थानींची चिंता वाढली आहे.