
अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष जास्तीतजास्त दोनवेळा पद भूषवू शकतात. मात्र, सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच आपण याबाबत कोणताही विनोद करत नसून हे विधान गांभीर्याने करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत संविधानात काही तरतुदी आहेत, त्यावर आमचे काम सुरू आहे, असे सांगत त्यांनी याबाबत अधिक माहिती देणे टाळले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या तिसऱ्या राष्ट्रध्यक्ष पदाबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत. एनबीसी न्यूजला रविवारी दिलेल्या टेलिफोन मुलाखतीत त्यांनी यावर थेट भाष्य केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी सांगितले की, ते अमेरिकेच्या संविधानाने राष्ट्राध्यक्ष पदासाठी दोन टर्म दिल्या आहेत. अेरिकेत तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष बनण्याची प्रथा नाही. मात्र, आपल्याला तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष बनण्याची इच्छा असून त्याबाबत विचार सुरू आहे,असे ते म्हणाले. 20 जानेवारी रोजी व्हाईट हाऊसमध्ये दुसऱ्यांदा पदभार स्वीकारणाऱ्या ट्रम्प यांनी तिसऱ्यांदा अध्यक्षपदाबाबतचे संकेत दिले आहेत.
याबाबत आपण विनोद करत नसून गांभर्याने हे विधान करत आहोत. संविधानात काही तरतुदी आणि पद्धती आहेत. त्यामुळे हे शक्य असल्याचे ते म्हणाले. मात्र, या विशिष्ट पद्धतींबद्दल अधिक तपशीलवार सांगण्यास नकार दिला. अमेरिकन संविधानाच्या 22 व्या दुरुस्तीनुसार, अमेरिकन अध्यक्षांना दोन टर्म म्हणजे चार वर्षे पदावर राहचा येते. ही घटनात्मक दुरुस्ती रद्द करण्याच्या प्रस्तावाला काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांमध्ये दोन तृतीयांश मत आणि 50 अमेरिकन राज्यांपैकी तीन-चतुर्थांश विधानसभेने मान्यता आवश्यक आहे.
ट्रम्प यांचे वय सध्या 78 असून ते सर्वाधिक वयाचे अमेरिकन अध्यक्ष होते. त्यांनी नोव्हेंबर 2028 च्या निवडणुकीनंतर आणखी चार वर्षांचा कार्यकाळ स्वीकारला तर ते 82 वर्षांचे असतील. 1796 मध्ये जॉर्ज वॉशिंग्टन यांनी दोन टर्मच्या अध्यक्षपदाचा आदर्श ठेवला, ही एक स्वयं-लादलेली मर्यादा होती. ती अमेरिकन अध्यक्षांनी 140 वर्षांहून अधिक काळ पाळली. 1940 पर्यंत फ्रँकलिन डी. रुझवेल्ट यांच्यापर्यंत ही परंपरा कायम होती.
महामंदी आणि दुसऱ्या महायुद्धादरम्यान अध्यक्ष असलेले डेमोक्रॅट रूझवेल्ट यांनी परंपरा मोडली आणि तिसरा टर्म सेवा केली, त्यानंतर 1945 मध्ये त्यांच्या चौथ्या टर्मच्या काही महिन्यांत त्यांचे निधन झाले. त्यानंतर 1951 मध्ये राष्ट्राध्यक्षपद दोन टर्मपर्यंत मर्यादीत करण्यात आले. ट्रम्पचे सल्लागार स्टीव्ह बॅनन यांनी 19 मार्च रोजी न्यूज नेशनला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की ट्रम्प 2028 मध्ये पुन्हा अध्यक्षपदाची निवडणूक लढवतील. ते कसे घडवून आणायचे, याचा आम्ही अभ्यास करत आहोत, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे या मुद्द्याची जगभरात चर्चा होत आहे.