डोंबिवली एमआयडीसीत फेज-2 मधील अंबर केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याने डोंबिवली पुन्हा हादरली आहे. या स्फोटात 4 जण ठार झाले असून 33 कामगार जखमी झाल्याची माहिती आहे. मृतांमध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. त्यातील 24 जखमी कामगारांना एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर उर्वरित 9 जणांवर नेपच्यून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डोंबिवलीत बचाव कार्यासाठी अग्निशमन दलाचे 13 बंब आणि 12 टँकर तसंच टीडीआरएफची 13 जवानांची टीम रवाना झाली आहे.
भीषण स्फोटानंतर कंपनीत मोठी आग लागली आहे. या आगीचे लोण आजूबाजूच्या दोन कंपन्यांमध्येही पसरले आहे. आगीच्या ज्वाळा अनेक किलोमीटर दुरूनही दिसत आहेत. तसेच धुराचे लोटही उठले आहेत. सध्या डोंबिवलीत काळा धूर पसरला आहे. या घटनेनंतर आजूबाजूच्या इमारतींमधील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
डोंबिवली एमआयडीसीमध्ये झालेल्या स्फोटामुळे आजूबाजूच्या इमारतींच्या काचा फुटल्या#MIDC #Dombivali pic.twitter.com/cgRTGTdBsb
— Saamana (@SaamanaOnline) May 23, 2024
एका पाठोपाठ स्फोट सुरू होते. या स्फोटाची कंपने अनेक किलोमीटपर्यंत जाणवली. डोंबिवली, डोंबिवली पश्चिम, कल्याण पूर्व भाग या स्फोटाने हादरला. स्फोटामुळे आगीने रौद्ररूप धारण केले आहे. तर स्फोटामुळे आजूबाजूच्या बहुतेक इमारतींच्या काचा फुटल्या आहेत. अग्नीशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या स्फोटात अनेक कामगार गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमी झालेल्या 35 ते 40 कामागारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बचावकार्य सुरू आहे. तसेच आग नियंत्रणात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
डोंबिवली MIDC तील केमिकल कंपनीत भीषण स्फोट, परिसर हादरला; पाच ते सहा कामगार जखमी pic.twitter.com/MbblgYbCIa
— Saamana (@SaamanaOnline) May 23, 2024
आजच्या स्फोटाच्या घटनेनंतर डोंबिवली एमआयडीत मे 2016 मध्ये प्रोबेस कंपनीत झालेल्या भीषण स्फोटाच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आहेत. या स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला होता. तर अनेकजण जखमी झाले होते.