डोंबिवलीतील एमआयडीसीमध्ये असलेल्यआ इंडो अमाईन आणि अन्य एका कंपनीला आग लागल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी धुराचे मोठे लोट पसरले असून अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. ही कंपनी एका शाळेजवळ असल्याने शाळेचे विद्यार्थी व परीसरातील नागरिकांत घबराट पसरली आहे. आधीच केमिकल कंपन्या हटवायची मागणी होत असताना आगीचे सत्र थांबत नसल्याने परिसरात भयाचे वातावरण पसरले आहे.
View this post on Instagram
डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान केमिकल कंपनीत बॉयलरच्या स्फोटात 11 कामगारांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी कंपनीमालक मलया प्रदीप मेहतावर (38) सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. दुर्घटना घडली तेव्हा 50 हून अधिक कामगार कंपनीत काम करत होते