
कल्याण-डोंबिवली पालिकेच्या शिक्षण विभागाने आठ अनधिकृत प्राथमिक शाळांची यादी जाहीर केली आहे. आठपैकी पाच शाळा या टिटवाळ्यातील आहेत, तर दोन शाळा आंबिवलीतील आणि एक शाळा डोंबिवलीतील आहे. या शाळांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. पालकांनी आपल्या मुलांना या शाळांमध्ये प्रवेश देऊ नये असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. पालिकेच्या या दणक्याने शिक्षण सम्राटांचे धाबे दणाणले आहेत.
अनधिकृत शाळांची यादी
■ एल.बी.एस. इंग्लिश स्कूल, बल्याणी-टिटवाळा. सनराईज स्कूल, बल्याणी-टिटवाळा.
■ संकल्प इंग्लिश स्कूल, बल्याणी-टिटवाळा. पूर्ण प्रज्ञा इंग्लिश स्कूल, बल्याणी-टिटवाळा.
■ पोलारिस कॉन्व्हेंट स्कूल, बल्याणी-टिटवाळा. डी.बी.एस. इंग्लिश स्कूल, आंबिवली (प.).
■ ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल, आंबिवली (प.). बुद्धिस्ट
■ इंटरनॅशनल स्कूल, महाराष्ट्रनगर, डोंबिवली (प.).
कल्याण-डोंबिवली पालिकेच्या
शिक्षण विभागाने पालिका हद्दीतील शाळांची तपासणी केली. यात आठ शाळा शासन मान्यता नसल्याचे आढळून आले. त्यानंतर बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या आठ प्राथमिक शाळांची यादी शिक्षण विभागाने जाहीर केली. या सर्व शाळा इंग्रजी माध्यमाच्या आहेत. या शाळेतील विद्यार्थ्यांचे अधिकृत शाळांमध्ये समायोजन करण्यात येणार आहे. शाळांमध्ये प्रवेश घेताना पालकांनी शाळेच्या मान्यते बाबत पालिका प्रशासनाकडून खातरजमा करावी असे आवाहन शिक्षण विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांनी केले आहे.