
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तब्बल 60 देशांवर जशास तसे आयात शुल्क लागू केल्यानंतर व्यापार युद्धाचा भडका उडाला. ट्रम्प यांनी राबवलेल्या अनेक धोरणांमुळे देशात महागाई, बेरोजगारी वाढली. त्यामुळे ट्रम्प आणि मस्क यांच्या मनमानी कारभाराविरोधात जनता रस्त्यावर उतरली. त्याचे पडसाद जागतिक बाजारात उमटले. याबाबत पत्रकारांनी विचारले असता ट्रम्प यांनी मात्र कुठे आहे महागाई, असा उलट सवाल केला. अमेरिकेतील याआधीच्या नेत्यांनी राबवलेल्या आर्थिक धोरणांमुळे चीनसारख्या देशांना अमेरिकेचा फायदा उचलण्याची संधी मिळाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
जगभरातील बाजारात मंदी आलेली असताना, बाजार कोसळलेला असताना डोनाल्ड ट्रम्प मात्र बिनधास्त आहेत. त्याप्रमाणेच हिंदुस्थानात आधीपासूनच बेरोजगारी, महागाई वाढलेली असताना आणि आता स्वयंपाकाचा गॅस 50 रुपयांनी महागलेला असताना, पेट्रोल, डिझेलचे दर वाढण्याचे संकेत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हिंदुस्थानात महागाई नसल्याचेच वेळोवेळी ठामपणे सांगितले. दोघेही एकमेकांना मित्र म्हणवतात. त्यामुळे दोस्त असावा तर असा… ट्रम्पतात्या सेम टू सेम नरेंद्रभाई… अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या.
तेलाच्या किमती कमी झाल्या असून व्याजदरही कमी झाले आहेत. अतिशय संथ गतीने कारभार सुरू असलेल्या फेडरल रिझर्व्हला व्याजदर आणखी कमी करण्याची गरज आहे. खाद्य पदार्थांच्या किंमती कमी झाल्या आहेत. कुठेही महागाई दिसत नाही. ब्रयाच मोठया कालावधीपासून अमेरिकेला चुकीची वागणूक देणाया देशांकडून दर आठवडयाला अब्जावधी डॉलर मिळत आहेत, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. चीनने अमेरिकेचे सर्वाधिक फायदा उचलला. मी इशारा दिल्यानंतरही त्यांनी 34 टक्के आयातशुल्क लादले. आता त्यांच्याच मार्पेटने जोरदार आपटी खाल्ली आहे, असे ट्रम्प म्हणाले.
सोन्या चांदीचे दर घसरले
अमेरिकेचे करधोरण आणि रशिया तसेच युव्रेन युद्धावरील अनिश्चिततेचे सावट याचा जागतिक बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला. सोन्याच्या किमती 2 हजार रुपयांनी घसरल्या. त्यामुळे प्रति 10 ग्रॅम सोन्याचे दर 88 हजार 50 रुपये इतके झाले. तर चांदीच्या दरात 5 हजार 500 रुपयांहून अधिक घट झाली.
ट्रम्प यांनी मोदींचा भ्रम तोडला- राहुल गांधी
अमेरिकेच्या करधोरणाचे पडसात जागतिक बाजारात उमटल्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज एक्सवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भ्रम तोडला आहे. मोदी कुठेच दिसत नाहीत. सत्य समोर येत आहे. हिंदुस्थानला सत्य स्वीकार करावेच लागेल. आपल्याला सर्व हिंदुस्थानींसाठी काम करणारी एक लवचिक, उत्पादनावर आधारित अर्थव्यवस्था बनवण्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही, असले राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
अतिरिक्त शुल्क नाही, हे तर औषध
कधी कधी बरे होण्यासाठी औषधाची गरज असते. तसेच जशास तशा अतिरिक्त शुल्काच्या बाबतीत आहे. विकेण्डला मी जगातील अनेक नेत्यांच्या संपका&त होतो. उलट ते अमेरिकेशी करार करण्यासाठी मरत आहेत, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना केला. जागतिक बाजारात अमेरिकेच्या कर धोरणाचे पडसाद उमटलेले असताना ट्रम्प यांनी करात कोणत्याही प्रकारची कपात करण्याचे कुठलेही संकेत दिले नाहीत.
n ट्रम्प यांच्या करधोरणामुळे अमेरिकेच्या शेअर बाजारात आज कामकाजाच्या सुरुवातीलाच 3 टक्क्यांची घसरण दिसली. त्यामुळे अर्थतज्ञांनी दिलेल्या इशाराऱयाप्रमाणे अमेरिकन शेअर बाजारासाठी ब्लॅक मंडे ठरला. एस आणि पी 500 मध्ये 5.97 टक्के, नॅस्डॅकमध्ये 5.82 टक्के आणि डॉवमध्ये 5.50 टक्क्यांची घसरण झाली.
मुंबई शेअर बाजारात भूकंप, 20 लाख कोटी बुडाले
आजचा दिवस मुंबई शेअर बाजारासाठी काळा दिवस ठरला. ट्रम्प यांच्या करधोरणामुळे सेन्सेक्स 2,226,79 अंकांनी घसरून तो 73.137.90 अंकांवर स्थिरावला. ही गेल्या दहा महिन्यांतील नीचांकी पातळी ठरली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 742.85 अंकांनी घसरून तो 22,161.60 अंकांवर बंद झाला. शेअर बाजारातील या भूपंपामुळे गुंतवणूकदारांचे तब्बल 20 लाख कोटी बुडाले. टाटा समूहाच्या तब्बल सहा पंपन्यांनी 1.28 लाख कोटी गमावले.