डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी विशेष न्यायालयाने तिन्ही आरोपी डॉक्टरांना दोषमुक्त करण्यास नकार दिला आहे. याप्रकरणातल्या पुढच्या सुनावणीपासून या डॉक्टरांवरील आरोप निश्चितीची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहर, डॉ. अंकिता खंडेलवाल यांनी दोषमुक्त होण्यासाठी केलेली याचिका फेटाळताना न्यायालयाने त्यांना प्रत्येकी 25 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
डॉ. पायल तडवी हिने 22 मे 2019 टी. एन. टोपीकाला नॅशनल मेडिकल कॉलेजच्या वसतीगृहात आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहर, डॉ. अंकिता खंडेलवाल यांना अटक केली. या तिन्ही डॉक्टरांच्या जातीवाचक शेरेबाजीला आणि छळाला कंटाळून डॉ. तडवी हिने आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.