बिहारमध्ये प्रेमाच्या नात्याला काळीमा फासणारी एक भयंकर घटना समोर आली आहे. एकीकडे राज्यात नवनवीन कायद्यांची अमंलबजालणी होत असताना दुसरीकडे सारणमध्ये मोठी घटना घडली. मथौरा येथील एका खसगी रुग्णालयातील डॉ. अभिलाषा कुमारीने वैयक्तिक वादातून तिचा प्रियकर वेद प्रकाश याचे गुप्तांग कापले. याप्रकरणी परिसरातील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सदर घटना ही 1 जुलै रोजी घडल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी घटनास्थळावरून काही पुरावे गोळा केले आहेत. दरम्यान डॉ. अभिलाषा कुमारी आणि तिचा प्रियकर वेद प्रकाश यांचे गेल्या पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. यादरम्यान अनेकदा शारिरीक संबंधही झाला. लग्नाचा विषय काढला की वेद प्रकाश नेहमी टाळायचा. त्याला माझ्यासोबत लग्न करायचे नव्हते, असे आरोपी डॉक्टर अभिलाषाने पोलिसांना सांगितले.
दरम्यान सोमवारी सकाळी याच गोष्टीवरून त्यांच्यात कडाक्याच भांडण झालं. ‘मला त्याचा राग आला होता. आमच्यात बऱ्याच दिवसापासून हा वाद सुरू होता. त्यामुळे माझा राग अनावर झाला आणि मी त्याच रागात येऊन चाकूने त्याचे गुप्तांग कापले व बाथरूममध्ये टाकून दिले’, असा कबुली जबाब आरोपी डॉ. अभिलाषाने पोलिसांना दिला आहे.
सदर घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला खुनाच्या प्रयत्नाच्या संबंधित कलमांतर्गत अटक केली आहे. तसेच पुढील तपास सुरू केला आहे. तसेच जखमीवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती ठीक आहे.