डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी पुतळ्याचा पायाभरणी समारंभ रविवार, 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता मिटमिटा येथील ऊर्जाभूमी स्मारकावर संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते होत आहे.
छत्रपती संभाजीनगरचा भूगोल बदलणारा व इतिहासाचे पान नव्याने लिहिणारा भव्य प्रकल्प मिटमिटा डोंगरावर साकारत आहे. ऊर्जाभूमी स्मारक या प्रकल्पांतर्गत महासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुढील पिढ्यांना प्रेरणादायी पुतळा उभा राहत आहे. या पुतळ्याच्या पायाभरणी समारंभास महाथेरो विशुद्धानंद बोधी, प्रसिद्ध विचारवंत, कवयित्री प्रा.डॉ. प्रतिभा अहिरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून, संभाजी भगत हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. या समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ऊर्जाभूमीचे संकल्पक तथा माजी नगरसेवक चेतन कांबळे यांनी केले आहे.