
लग्नाचा सीझन सुरु झाल्यानंतर, सर्वात महत्त्वाची तयारी सुरु होते ती शाॅपिंगची. पण या शाॅपिंगच्या जोडीला मेकअप आणि लग्नातील एकूण लूक कसा असेल यासाठी आटापिटा सुरु होतो. लग्नात तुमचा आऊटफिट तर सुंदर असायलाच हवा, पण याहीबरोबरीने आपला चेहराही सुंदर ठेवणे खूप गरजेचे आहे. लाखो रुपयांचे कपडे अंगावर आहेत, पण तुमचा चेहरा निस्तेज दिसत असेल तर, तुमचा लूक पूर्णपणे फिका पडेल. म्हणूनच लग्नाआधी केवळ काही दिवस काळजी घेतल्यास, लग्नाच्या दिवशी वधूच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक दिसून येते.
लग्नाच्या दिवशी सर्वांच्या नजरा वधूचा लूक पाहण्यासाठी उत्सुक असतात. प्रत्येकाला फक्त वधूची एक झलक पहायची असते. म्हणूनच वधूला उन्हाळ्यात त्वचेची अधिक काळजी घ्यावी लागते. घाम आणि उष्णतेमुळे, मेकअप खराब झाल्यास चेहरा काळपट दिसण्याची शक्यता अधिक असते. वधूच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक पाहायची असेल, तर हे घरगुती नाईट क्रीम लावून बघा, अवघ्या 10 दिवसांमध्ये तुमचा चेहरा खुलून येईल.
घरी नाईट क्रीम कशी बनवायची?
साहित्य
चंदन तेल – 2 टेबलस्पून
पपई जेल – 2 टेबलस्पून
टी ट्री तेल – 2 टेबलस्पून
रोझमेरी तेल – 2 टेबलस्पून
गुलाबजल – 2 टेबलस्पूनकृती- ही क्रीम बनवण्यासाठी सर्वात आधी एका भांड्यात चंदनाचे तेल आणि टी ट्री आॅइल घ्यावे लागेल आणि ते हलके गरम करावे लागेल. यानंतर त्यात पपई जेल आणि रोझमेरी तेल मिसळावे. हे सर्व पदार्थ चांगले मिसळा आणि गॅस बंद करा. थंड झाल्यावर त्यात गुलाबजल घाला आणि चांगले मिसळा. अशापद्धतीने घरगुती नाईट क्रीम तयार होईल.
ही क्रीम छोट्या काचेच्या भांड्यात भरुन ठेवा. लग्नाआधी किमान दहा दिवस ही क्रीम रोज रात्री झोपताना चेहऱ्यावर लावावी. यामुळे चेहऱ्यावर ग्लो यायला सुरुवात होईल.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)