द्रमुक नेत्याच्या मुलानेच साकारले होते रुपयाचे चिन्ह

तामीळनाडू सरकार आणि केंद्र सरकारमध्ये हिंदी-तमीळ असा वाद पेटला असून तामीळनाडूच्या विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प मांडताना रुपयाच्या चिन्हाऐवजी तमीळ भाषेतील रुबई हे नवे चिन्ह वापरण्यात आले. मात्र, हे चिन्ह एका तमीळ भाषिक माणसानेच बनवल्याचे समोर आले आहे. केंद्र सरकारने मंजुरी दिलेल्या रुपयाच्या चिन्हाला द्रमुक सरकारने आव्हान दिले असले तरीही रुपयाचे चिन्ह द्रमुक नेत्याच्या मुलानेच बनवले आहे. उदयकुमार धर्मलिंगम असे रुपयाचे चिन्ह साकारणाऱया व्यक्तीचे नाव असून त्यांचे वडील द्रमुकचे नेते आणि आमदार होते.