भाऊबीज साजरी करण्यामागे यमधर्माची आहे कथा; जाणून घ्या कहाणी आणि महत्त्व…

>> योगेश जोशी

यमाचे नाव घेतले की अनेकांनी धडकी भरते, यम आणि मृत्यू यांचे नाते आहे. कोणत्याही जिवांचे प्राण हरण करून त्याला यमलोकतच नेत त्याच्या जीवनातील कार्यकाळाचे मूल्यमापन करत त्याला योग्य ते शासन करण्याचे काम यमधर्माचे आहे. तर जीवनात होणाऱ्या अनेक चुंकासाठी त्याचे शासन करण्याचे काम शनिदेवांचे आहे. त्यामुळे ही दोन नावे आले की अनेकांना भीती वाटते. मात्र, ही भीती दूर करण्यासाठी दिवाळीत यमधर्माचे पूजन करण्याची प्रथा आहे.

दिवाळीत धनत्रयोदशीला यमदीपदान करण्यात येते. नरक चतुर्दशाली दक्षिणकेड तोंड करून दिवे लावण्यात येतात. दिवाळी पाडव्याला यमधर्मासाठी तर्पण करण्यात येते. तर भाजबीज म्हणजेच यमद्वितीया हा सण यमधर्माशी संबंधित आहे. याबाबत अनेक आख्यायिका आणि कथा सांगण्यात येतात. जामून घेऊया याबाबतची कहाणी…

भाऊबीज सण कार्तिक शुद्ध द्वितीया (यमद्वितीया) या दिवशी साजरा करण्यात येतो. या दिवशी भाऊ दिवाळीच्या फराळाचे गोडधोड घेऊन बहिणीच्या घरी जातो. सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ मग ओवाळणीचे ताटात ‘ओवाळणी’ देत बहीणाला भेट देतो.

या दिवशी यमराजाने आपली बहीण यमुनेच्या (यमी) घरी जाऊन तिला वस्त्रे अलंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी भोजन केले होते. त्यामुळे या दिवसाला यमद्वितीया म्हणतात. या दिवशी यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानतात. असे केल्यामुळे यमापासून आणि अपमृत्यूचे भय नसते, अशी मान्यता आहे. तेव्हापासून भाऊबीजेची प्रथा पडली. भावाचे आयुष्य वाढावे आणि त्याच्यावरील अपमृत्यूचे आणि संकंटे दूर व्हावी यासाठी बहिणीकडून यमराजाची पूजा आणि प्रार्थना करण्यात येते.

या दिवशी आधी चंद्राला त्यानंतर भावाला ओवाळल्यास यमराजाच्या पाशातून म्हणजे अपमृत्यूपासून भावाची सुटका होते, अशआ मान्यता आहे. बहीणीने प्रमाने ओवाळल्यानंतर भाऊ बहीणीला भेटवस्तूंची ओवाळणी देतो. या दिवशी घरी किंवा पत्नीच्या हातचे जेवण करू नये. बहीणीने केलेल्या जेवणाचा स्वीकार करावा, अशीही मान्यता आहे. एखाद्या महिलेला भाऊ नसल्यास चंद्ला भआऊ समजून ओवाळण्याची प्रथा आहे.