दिवाळीच्या पूर्वसंध्येला अयोध्यानगरी उजळून निघाली. शरयू नदीच्या 55 घाटांवर तब्बल 28 लाख दिवे प्रज्वलित करून एक नवा विक्रम प्रस्थापित करण्यात आला. शानदार सोहळय़ात दीपोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी 1 हजार 600 अर्चकांनी शरयू नदीकिनारी आरती केली. त्याआधी प्रभू श्रीराम, सीता आणि लक्ष्मण पुष्पक विमानाने आले. त्यांचे ‘जय श्रीराम’च्या जयघोषात स्वागत करण्यात आले. प्रभू श्रीराम रथावर आरुढ झाले आणि दिमाखात मार्गस्थ झाले. रामकथा उद्यानात रामाची आरती करून राजतिलक सोहळा करण्यात आला.