टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि तिचा पती विवेक दहिया या दोघांची अखेर मायदेशी घरवापसी झाली. या दोघांचे परदेशात पासपोर्टसह अन्य काही सामान चोरीला गेले होते. त्यामुळे ते परदेशात अडकले होते. हिंदुस्थानी दूतावासाच्या मदतीने अखेर हे दोघे परतले आहेत. लग्नाचा आठवा वाढदिवस साजरा करण्यासाठी ते युरोप ट्रिपवर गेले होते. परंतु फ्लोरेन्स शहरात त्यांच्या कारमधून सामान चोरीला गेले होते. सोशल मीडियावरून त्यांनी ही माहिती देत मदतीची विनंती केली होती. मायदेशी परतल्यानंतर दिव्यांकाने पोस्ट शेअर करत हिंदुस्थानी दूतावासाचे आभार मानले.