घटस्फोटित मुस्लिम महिला पोटगी मागू शकते! सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल

सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केले आहे की घटस्फोटित मुस्लिम महिलेला फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPc) च्या कलम 125 अंतर्गत तिच्या आधीच्या पतीकडून पोटगी मिळवण्याचा अधिकार आहे.

न्यायमूर्ती बीव्ही नागरत्ना आणि ऑगस्टिन जॉर्ज मसिह यांच्या खंडपीठाने ऐतिहासिक शाह बानो प्रकरणातील याचिका फेटाळून लावली, ज्यामध्ये त्या व्यक्तीने कलम 125 सीआरपीसी अंतर्गत घटस्फोटित पत्नीला अंतरिम पोटगी देण्याच्या निर्देशाविरुद्ध याचिका दाखल केली होती.

मुस्लिम महिला (घटस्फोटावरील हक्कांचे संरक्षण) कायदा 1986 हा धर्मनिरपेक्ष कायद्यावर मात करणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले.