प्रसिद्ध गायक आणि संगीतकार एआर रहमान यांच्या घटस्फोटाच्या बातमीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. जवळपास 30 वर्षांनंतर, एआर रहमान आणि त्यांची पत्नी सायरा बानो यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या निर्णयाने सर्व चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ए.आर. रहमान यांच्या याआधी आमिर खान, कमल हासन आणि कबीर खान यांसारख्या अनेक मोठ्या सेलिब्रिटींनी लग्नाच्या अनेक वर्षांनी घटस्फोट घेतले आहेत. ज्याला ग्रे घटस्फोट देखील म्हणतात. यातच हिंदुस्थानात घटस्फोटाचा वाढता आलेख आणि त्याची कारणे आपण जाणून घेणार आहोत…
किती टक्के वाढली घटस्फोटाची प्रकरणे?
गेल्या काही वर्षांत हिंदुस्थानात घटस्फोटाच्या घटनांमध्ये किती टक्के वाढ झाली आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. नॅशनल फॅमिली अँड हेल्थ सर्व्हेनुसार, गेल्या पाच वर्षांत घटस्फोटाच्या घटनांमध्ये 35 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही अतिशय चिंताजनक आकडेवारी आहे.
याशिवाय संयुक्त राष्ट्रांनी जारी केलेल्या अहवालातील आकडेवारीही भीतीदायक आहे. त्यानुसार गेल्या काही वर्षांत हिंदुस्थानात घटस्फोटाच्या घटनांमध्ये जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. 2005 मध्ये हा दर 0.6 टक्के होता, तर 2019 मध्ये तो 1.1 टक्के झाला.
घटस्फोटाची ही आहेत सर्वात मोठी कारणे
- घरगुती हिंसा आणि फसवणूक.
- एमटी नेस्ट सिंड्रोम.
- नव्याने सुरुवात करण्याची इच्छा.
- अनेक वर्षांच्या अपमानाचा बदला.
- नात्यात आदर न मिळणे.
- भावनिक आणि शारीरिक आधाराचा अभाव.
- एखादी दुसरी व्यक्ती आवडणे.