सांगलीतील साडेसोळा हजार आजी-आजोबांनी दिली परीक्षा

प्रौढ शिक्षणाऐवजी ‘सर्वांसाठी शिक्षण’ या नावाने सुरू असलेल्या ‘उल्लास नव भारत साक्षरता’ कार्यक्रमांतर्गत असाक्षरांची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षा जिल्ह्यातील 2 हजार 76 केंद्रांवर रविवारी (दि. 23) उत्साहात पार पडली. साक्षर होण्याचे अधुरे स्वप्न पूर्ण करून असाक्षरतेचा कलंक पुसण्यासाठी सांगली जिल्ह्यातील 16 हजार 560 आजी आजोबांनी परीक्षा दिली.

शालेय शिक्षण विभागातील सर्व यंत्रणा ज्येष्ठांच्या परीक्षेसाठी कामाला लागली आहे. मागील शैक्षणिक वर्षात ही परीक्षा 17 मार्च रोजी घेण्यात आली होती. वर्षातून दोनवेळा म्हणजे सप्टेंबर व मार्च महिन्यात केंद्र शासनाकडून या परीक्षेचे आयोजन करण्यात येते. असाक्षर व स्वयंसेवक ऑनलाइन नोंदणी उल्लास अॅपवर वर्षभर सुरू असते. ज्या शाळेतून असाक्षरांची नोंदणी झाली आहे, त्याच शाळेत त्यांना परीक्षा केंद्र देण्यात येते. रविवारी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत असाक्षरांनी त्यांच्या सोयीने परीक्षा केंद्रांवर परीक्षा दिली. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत व महापालिकेच्या परीक्षा केंद्रांवर 16 हजार 560 आबालवृद्धांनी दिली. त्यामध्ये 12 हजार 737 स्त्रिया आणि 3 हजार 793 पुरुष परीक्षार्थी होते.

रविवारी होणारी लेखी परीक्षा 150 गुणांची असून, वाचन 50, लेखन 50, संख्याज्ञान 50 अशी गुणविभागणी आहे. प्रत्येक भागात 16.5 व एकूण 49.5 गुण उत्तीर्णतेसाठी आवश्यक आहेत. त्यामुळे आता असाक्षर आजी-आजोबा, आई-बाबा, काका-मामा, काकू आणि मावशी आपल्या पाल्यांसोबत अन् स्वयंसेवकांसोबत