मानव आणि इतर बहुतेक सस्तन प्राण्यांमध्ये दोन लैंगिक गुणसूत्र असतात. महिलांच्या पेशींमध्ये दोन X गुणसूत्र असतात, तर पुरुषांच्या पेशींमध्ये एक X आणि एक Y असतो. दरम्यान नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार Y गुणसूत्र नामशेष होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संशोधनाच्या परिणामांमुळे मानवी पुनरुत्पादनाच्या भविष्याविषयी चिंता निर्माण झाली आहे. जर Y गुणसूत्र हळूहळू कमी झाले तर संपूर्ण जगात फक्त मुलीच जन्माला येतील. नवीन लिंग निर्धारित करणारे जनुके विकसित होईपर्यंत हा धोका कायम राहील.
पुरुष गुणसूत्रांमध्ये घट झाल्यामुळे शास्त्रज्ञांमध्ये मानवी जातीच्या अस्तित्वाविषयी चिंता भेडसावू लागली आहे. सायंस अलर्टच्या रिपोर्टनुसार, मुलगा जन्माला येण्यासाठी Y गुणसूत्र असणे गरजे असते. मात्र रिसर्चनुसार मानवातील Y गुणसूत्र कमी होत आहेत. याचा मानवाच्या भविष्यावर परिणाम होऊ शकतो. या प्रक्रियेला अनेक वर्षे लागण्याचा देखील अंदाज वर्तवण्यात आला आहे. जर मानवाला यावर पर्यायी गुणसूत्र शोधता आले नाहीत तर, पृथ्वीवरील मानव जात हळूहळू नष्ट होण्याची शक्य़ता आहे.
दरम्यानच्या काळात ‘प्रोसिडिंग ऑफ द नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेस’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका शोधनिबंधातही एक चांगली बातमी समोर आली आहे. 2022 च्या रिसर्चमध्ये असे आढळून आले की, उंदरांच्या दोन प्रजातींनी त्यांचे Y गुणसूत्र गमावले. मात्र तरीही त्यांच्या प्रजाती जीवनचक्र कायम ठेवण्यात यशस्वी झाल्या आहेत. नर उंदराच्या जन्मासाठी आवश्यक असलेले Y गुणसूत्र नामशेष होण्यापूर्वीच उंदरांच्या एका प्रजातीने एक नवीन गुणसूत्र विकसित केल्याचे संशोधनातून समोर आले आहे. त्यामुळे मानवामध्येही असे काही चमत्कारीक घडू शकते, असा विश्वास शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.
महिला आणि पुरूषांमध्ये X आणि Y दोन्ही गुणसूत्र असतात. त्यापैकी त्यापैकी X मध्ये तब्बल 900 जीन तर Y मध्ये तब्बल 55 जीन असतात. 166 दशलक्ष वर्षांपूर्वी 900 Y गुणसूत्र होते, आता ते फक्त 55 इतके कमी झाले आहेत. जर हा कल असाच चालू राहिला तर पुढील 11 दशलक्ष वर्षांत Y गुणसूत्र पूर्णपणे नाहीसे होऊ शकते.