सुभाष घई लीलावती रुग्णालयात दाखल

बॉलीवूडचे प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक सुभाष घई यांची प्रकृती बिघडली असून त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुभाष घई यांना बुधवारी श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि वारंवार चक्करदेखील येत होती. त्यांच्यावर सध्या आयसीयूमध्ये न्यूरोलॉजिस्ट डॉ. विनय चौहान, हृदयरोगतज्ञ डॉ. नितीन गोखले आणि पल्मोनोलॉजिस्ट डॉ. जलील पारकर यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. सुभाष घई यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून त्यांना आयसीयूमधून सामान्य वॉर्डमध्ये हलवण्यात येणार आहे.