
उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद आणि आग्य्रामध्ये राहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गाझियाबादच्या हिंडन एअरपोर्ट सिव्हिल टर्मिनलहून शनिवारी चेन्नई आणि रविवारी जम्मूसाठी एअर इंडिया एक्स्प्रेसची हवाई सेवा सुरू केली जाणार आहे, तर आग्य्राहून आता थेट बंगळुरू आणि अहमदाबादसाठी आठवडय़ातील सातही दिवस फ्लाईट मिळेल.
इंडिगो एअरलाईन्सकडून ही नवी सुविधा 1 एप्रिल 2025 पासून सुरू केली जाणार आहे. याआधी आग्राहून बंगळुरूसाठी थेट विमान सेवा आठवडय़ातील केवळ चार दिवस सुरू होती, तर अहमदाबादसाठी 6 दिवस होती. हैदराबाद आणि मुंबईच्या फ्लाईटची सेवा मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी सुरू राहणार आहे. तसेच आग्य्राहून मुंबई आणि हैदराबादसाठी उड्डाण आधीसारखेच सुरू राहील.
एअर इंडिया एक्स्प्रेसकडून हिंडन एअरपोर्टवर फ्लाईट सकाळी 9.45 वाजता उड्डाण करेल. सकाळी 11.20 वाजता जम्मू विमानतळावर पोहोचेल. जम्महून दुपारी 1 वाजता उड्डाण करेल ते हिंडन एअरपोर्टवर दुपारी 2.30 वाजता पोहोचले. एअर इंडिया एक्स्प्रेसच्या 180 सीटचे विमान जम्मूसाठी उद्या, 23 मार्चपासून उड्डाण करेल. जम्मूहून कटराचे अंतर केवळ एक तासाचे आहे.