माजी अपर मुख्य सचिव दिनेश वाघमारे यांनी आज राज्य निवडणूक आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी त्यांचे स्वागत केले. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी 20 जानेवारी 2025 रोजी अधिसूचना प्रसिद्ध करत दिनेश वाघमारे यांची पाच वर्षांसाठी राज्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. त्यानुसार त्यांनी आज राज्याचे सातवे राज्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. माजी आयुक्त यू. पी. एस. मदान यांचा कार्यकाळ 4 सप्टेंबर 2024 रोजी संपल्यापासून हे पद रिक्त होते.