दरोडय़ाच्या तयारीत आलेल्या अब्दुल रफिक अब्दुल हमीद अन्सारी, अक्षय कोतेकर, शोएब खान या त्रिकुटाला दिंडोशी पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. गोरेगाव पूर्व येथे काही जण दरोडय़ाच्या तयारीने येणार असल्याची माहिती दिंडोशी पोलिसांना मिळाली. मंगळवारी पोलिसांनी साध्या वेशात तेथे सापळा रचला. पोलिसांना पाहताच ते पळून जाऊ लागले. पोलिसांनी पाठलाग करून तिघांना ताब्यात घेतले, तर तीन जण हे अंधाराचा फायदा उचलून पळून गेले. त्या तिघांकडून पोलिसांनी दरोडय़ाचे साहित्य जप्त केले. अटक केलेले ते तिघे हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत.