
घटस्फोटित आणि विधुर महिलांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे दागिने घेऊन पळणाऱ्या लखोबाला दिंडोशी पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. प्रमोद नाईक असे त्याचे नाव आहे. तो दागिने घेऊन विक्रीसाठी पुणे येथे गेला होता. सोन्यावर कर्ज देणाऱ्या पंपनीला ते दागिने विक्री करण्याचा त्याचा प्रयत्न होता. त्याला अटक करून मुंबईत आणण्यात आले.