दिल्लीतील जवाहरलाल स्टेडिअमध्ये 26 आणि 27 ऑक्टोबरला दिलजीत दोसांझचा कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, कॉन्सर्टनंतरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये कॉन्सर्टनंतर या ठीकाणची घाणीचे साम्राज्य दिसून आले. सर्वत्र दारुच्या बॉटल्स आणि कचऱ्याचा ढीग पडला होता. यामुळे खेळाडूंचं नुकसान झालं आहे.
दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता कॉन्सर्टनंतर स्टेडिअमवरील परिस्थितीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. दिलजीतच्या कॉन्सर्टमुळे खेळाडूंचं नुकसान झाल्याचं दिसत आहे. यामुळे दिलजीत आणि आयोजकांवर टीका केली आहे. दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टपूर्वी, खेळाडूंनी त्यांचे ॲथलेटिक्सचं सामान वॉर्म अपसाठी ठेवलं होतं. खेळाडूंनी स्वत:च्या पैशातून या वस्तू खरेदी केल्या होत्या. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, आयोजकांनी ॲथलेटिक्सचं सामान अतिशय चुकीच्या पद्धतीने वापरलं. ॲथलेटिक्सचं साहित्य चुकीच्या प्रकारे ठेवल्यामुळे त्यांची मोडतोड होऊन खेळाडूंचं मोठं नुकसान झालं आहे. यातील बरंचसं सामान तुटलं आहे.
View this post on Instagram
खेळाडूंचे हे वैयक्तिक सामान निष्काळजीपणे ठेवण्यात आले होते. तसेच खेळाडूंनी यासंदर्भात SAI ( sports authority of india) कडे तक्रार केली आहे. कार्यक्रम आयोजित करण्याचा हा कोणता मार्ग? असा प्रश्न कोचने उपस्थित केला आहे.