लोकांचं हृदय जिंकणारा दिलजीत! पंजाबी गायक दिलजीत दोसांझचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक

पंजाबी चित्रपटसृष्टी आणि संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध कलाकार, गायक दिलजीत दोसांझ याने नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी दिलजीतच्या मेहनतीचे आणि संगीत क्षेत्रातील योगदानाचे तोंडभरून कौतुक केले.

हिंदुस्थानातील एका खेड्यातील मुलगा आपल्या मेहनतीने देश आणि जगात नाव कमावतो तेव्हा अभिमान वाटतो. कुटुंबाने तुझे नाव दिलजीत ठेवले आहे. तू खरोखरच लोकांचे हृदय जिंकत आहे, असे पंतप्रधान मोदी दिलजीतचे कौतुक करताना म्हणाले.

या भेटीदरम्यान दिलजीत दोसांझ यानेही आपले मत मांडले आणि हिंदुस्थानी संस्कृतीच्या महानतेचे कौतुक केले. आपला देश महान आहे हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. पण जेव्हा मी स्वत: देशभर फिरलो आणि देश जवळून पाहिला तेव्हा यातील विविधता मला समजून घेता आली. तेव्हा मला जाणवले की देशाची महानता फक्त शब्दात नाही तर सत्यातही आहे, असे दिलजीत दोसांझ म्हणाला.

Image

दरम्यान, दिलजीत आणि पंतप्रधान मोदी यांनी भेटीदरम्यान योगावरही चर्चा केली. या भेटीचा व्हिडीओ पंतप्रधान मोदी आणि दिलजीतने आपापल्या सोशल मिडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. 2025 ची सुरुवात एका अप्रतिम भेटीने झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची संधी मला मिळली. आम्ही संगीत आणि इतर गोष्टींवरही चर्चा केली. हा माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण आहे, असे दिलजीत आपल्या पोस्टमध्ये म्हणाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Narendra Modi (@narendramodi)