दिलीप प्रभावळकर यांना ‘गो. ना. अक्षीकर’ पुरस्कार

‘जनरल एज्युकेशन इन्स्टिटय़ूट’  आणि ‘आम्ही छबिलदासी’ आयोजित माजी विद्यार्थी- विद्यार्थिनींचा मेळावा शनिवार, 5 एप्रिल सायंकाळी 5.30 वाजता छबिलदास मुलांची शाळा, दादर येथील वातानुकूलित सभागृहात होणार आहे. यावेळी ‘गो .ना. अक्षीकर’ पुरस्कार शाळेचे माजी विद्यार्थी व ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना देण्यात येणार आहे. यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी राजन ताम्हाणे त्यांची मुलाखत घेतील. या कार्यक्रमासाठी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ‘आम्ही छबिलदासी’चे अध्यक्ष किशोर रांगणेकर यांनी केले.