हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 23जानेवारी रोजी असलेल्या जन्मदिनानिमित्त शिवसेना, युवासेना आणि विविध सामाजिक संस्थांतर्फे मुंबईसह राज्यभरात रक्तदान शिबीर, रुग्णांना फळवाटप अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
– युवासेना मुंबई समन्वयक अभिषेक पाताडे आणि शिवसेना शाखा क्र. 194 यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘भगवा जल्लोष’अंतर्गत आधार कार्ड अभियानाच्या दुसऱया दिवशीसुद्धा नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिवसेना नेते दिवाकर रावते, माजी महापौर आणि विभाग संघटक श्रद्धा जाधव आणि शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे यांनीदेखील या कार्यक्रमाला भेट देऊन आयोजकांचे काwतुक केले. विभागातील रहिवाशांनी या अभियानाचा लाभ घेतला.
– शिवसेना शाखा क्र. 215 आणि रिलायन्स हेल्थ फाऊंडेशनच्या वतीने महिला आणि मुलींसाठी गर्भाशयाचा कर्परोग होऊ नये म्हणून लसीकरण शिबीर आयोजित केले होते. यावेळी विभाग संघटक युगंधरा साळेकर, दक्षिण मुंबई महिला समन्वयक सुरेखा परब, मलबार हिल विधानसभा संघटक सुरेखा उबाळे, नंदा शेलार, यशोदा कोटियन, विनायक रामाणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेविका अरुंधती दुधवडकर, शाखाप्रमुख विजय पवार, हेमंत दुधवडकर, सुप्रिया शेडेकर यांनी केले होते.
शिवडीकरांना सांस्पृतिक कार्यक्रमांची पर्वणी
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना पुरस्पृत बालविकास मित्र मंडळ व सिद्धी संस्पृती फाऊंडेशनच्या वतीने शिवडी महोत्सवअंतर्गत भगवा चषक 2025चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव 27 जानेवारीपर्यंत शिवडी रामटेकडी बालविकास मनोरंजन मैदान येथे आयोजित करण्यात आला आहे.
या महोत्सवाअंतर्गत 21 जानेवारी रोजी सायंकाळी 7 ते रात्री 10 या वेळेत एकेरी नृत्य स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा केवळ शिवडी विधानसभेकरिता मर्यादित आहे. 22 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता प्रभाग क्रमांक 206 मधील ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान सोहळा तर 23 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता समूह नृत्य स्पर्धा होणार आहे. 24 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता पाककला स्पर्धा तर 25 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता खेळ खेळूया पैठणीचा, हळदी-पुंपू समारंभ होणार आहे. 26 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता चित्रकला स्पर्धा तर 27 जानेवारी रोजी सायंकाळी 6.30 वाजता मराठी, हिंदी वाद्यवृंदाचा कार्यक्रम होईल. या शिवडी महोत्सवात शिवडी विधानसभेतील सर्व प्रमुख तसेच आजी-माजी पदाधिकारी आणि इतर प्रमुख मान्यवरदेखील उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आयोजक, माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी दिली.