
डाएट करायचा असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. सोशल मीडियावरील व्हिडीओ पाहून डाएट प्लान करणे टाळावे.
बारीक होण्यासाठी केलेले डाएट एका 18 वर्षीय तरुणीच्या जिवावर बेतले. तिने बारीक होण्यासाठी यूटयूबवर असलेल्या वेगवेगळ्या व्हिडीओची मदत घेतली होती. त्यानुसार तिने डाएट सुरू केले होते. परंतु वजन वाढण्याच्या भीतीने तिने जेवण सोडले होते. वजन कमी करण्यासाठी तिने एक खास डाएट प्लान फॉलो केला होता. हाच प्लान तिच्या जिवावर बेतला.
श्रीनंदा असे या तरुणीचे नाव असून ती केरळमधील कन्नूरची रहिवासी आहे. ती महाविद्यालयात शिक्षण घेत होती. बरेच दिवस जेवण सोडल्याने तिला प्रचंड अशक्तपणा आला होता. तिला थालास्सेरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. वजन वाढण्याच्या भीतीने ती जेवायची नाही. तसेच ती खूप व्यायाम करायची. केवळ लिक्विड डाएट करायची, असे तिच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना सांगितले.