Diet In Pregnancy- प्रेग्नेंट असताना जंकफूड खाणे सोडा; सकस आहार हाच उत्तम आहार!

प्रेग्नेन्सी हा प्रत्येक स्त्रीसाठी दुसरा जन्म मानला जातो. म्हणूनच या काळामध्ये स्वतःकडे लक्ष देणं हे खूपच गरजेचे आहे. प्रेग्नेंट असताना खासकरून आपला आहार कसा असायला हवा हे प्रत्येक स्त्रीने तपासायला हवं. केवळ इच्छा होतं नाही म्हणून, घरातील अन्नाला नाकारुन जंक फूड खाणं हे धोक्याचे आहे. जंक फूडमुळे तात्पुरती भूक भागेल, पण शरीराला कहीच पोषण न मिळाल्याने होणाऱ्या अपत्यासाठी सुद्धा ते धोक्याचे ठरू शकते. म्हणूनच प्रेग्नेंट असताना घरातील साधा सोपा सकस आहार हाच उत्तम मानला जातो.

 

प्रेग्नेंट असताना आहार कसा असायला हवा?

तुमच्या नाश्त्यात सफरचंद, केळी आणि संत्री यासारखी ताजी फळे आणि बदाम, अक्रोड इत्यादी सुक्या मेव्यांचा समावेश करा. यामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे जास्त प्रमाणात असतात.

 

दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात जे पचनसंस्था निरोगी ठेवतात. त्यात ग्रॅनोला किंवा मध घालून खाल्ल्याने चव आणि पोषण दोन्ही वाढते.

 

 

पीनट बटर आणि होल ग्रेन ब्रेड प्रथिने आणि फायबरने समृद्ध असते, जे तुम्हाला बराच काळ पोट भरलेले ठेवते.

 

गरोदरपणात भाज्यांचे सूप आणि सॅलड तुमच्या आहाराचा एक भाग बनवा. ते जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सचे उत्कृष्ट स्रोत आहेत.

 

मूग डाळ चिला हा एक आरोग्यदायी आणि प्रथिनेयुक्त नाश्ता आहे. कमी तेलात तव्यावर भाजून तुम्ही हेल्दी ब्रेकफास्ट म्हणून नक्कीच खाऊ शकता.

 

ओट्स किंवा दलियामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, जे बद्धकोष्ठतेची समस्या कमी करते आणि ऊर्जा देते.

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)