
पुणे – अहिल्यानगर महामार्गावर चास गावाजवळ अपघात होऊन डिझेल टँकर उलटल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गावाजवळ चालकाला धोकादायक वळणाचा अंदाज न आल्याने भरधाव वेगाने येणारा डिझेल टँकर उलटला. टँकर उलटल्यानंतर यातील डिझेल रस्त्यावर सोडलं.
टँकर उलटल्यानंतर येथे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. तसेच येथे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात लोकही जमली होती. यावेळी उलटलेल्या टँकरमधून डिझेल रस्त्यावर वाहत असल्याचं पाहून अनेक लोकांची डिझेल घेण्यासाठी झुंबड उडाली. याचा व्हिडीओही समोर आला आहे. ज्यात लोक डिझेल घेण्यासाठी एकमेकांना धक्काबुक्की करत असल्याचं दिसत आहे. दम्यान, घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. तसेच येथील वाहतूक कोंडीही सोडवण्यात आली आहे.