धुळे जिल्हा परिषदेच्या निमखेडी येथील शाळेत पेनाचे टोपण श्वासनलिकेत अडकल्याने पहिलीत शिकणाऱ्या अर्चना युवराज खैरनार या मुलीचा मृत्यु झाला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
धुळे जिल्हा परिषदेच्या निमखेडी येथील शाळेचे वर्ग गुरुवारी नियमितपणे सुरू होते. पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या अर्चना युवराज खैरनार हिने लिहतांना पेनाचे टोपन वेगळे केले. लिहीत असतांना नकळतपणे तिच्याकडून पेनाचे टोपण गिळले गेले. त्यानंतर हे टोपण श्वसन मार्गात अडकले. वर्ग शिक्षकांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी अर्चनाला तात्काळ रूग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी तपासणी अंती अर्चना खैरनारला मृत घोषित केले. अर्चना ही निमखेडी येथे आजोबा चुडामण निकम यांच्याकडे शिक्षणासाठी राहत होती. अर्चनाच्या मृत्युची माहिती कळाल्यानंतर तिच्या आजी-आजोबांना अश्रु अनावर झाले.