धुळ्यातील गांजाची शेती केली उद्ध्वस्त, 490 किलो गांजा केला नष्ट

धुळे जिल्ह्यातील उसाच्या शेताआड केलेली गांजाची शेती महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) उद्ध्वस्त केली. डीआरआयने कारवाई करून एकूण 490 किलो गांजा नष्ट केला. सुमारे 9.493 एकर क्षेत्रफळात ती गांजाची लागवड केली जात होती.

धुळे जिह्यातील खामखेडा आंबे आणि रोहिणी गावात बेकायदेशीर गांजाची लागवड होत असल्याची माहिती डीआरआय मुंबई युनिटला मिळाली. त्या माहितीनंतर पुणे आणि नागपूर युनिट संयुक्त कारवाईला सुरुवात केली. डीआरआयच्या पथकाने मध्य प्रदेश-महाराष्ट्र सीमेवरील दुर्गम भागात पाळत ठेवली. पथकाने जिल्हा प्रशासन आणि न्यायदंडाधिकाऱयांना संपर्क साधला. न्यायदंडाधिकाऱयांच्या उपस्थितीत पाहणी केली असता, एकूण 9.493 एकत्र क्षेत्रफळात सात ठिकाणी गांजाची बेकायदेशीर लागवड होत असल्याचे समोर आले.