बांधकाम सुरू असलेली भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच वर्षीय मुलीसह दोन जण जखमी झाले आहेत. धारावी पत्रा चाळ लक्ष्मी बंगला येथे ही घटना घडली असून जखमींना शीव रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून तिघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मुंबईत गेल्या पाच-सहा दिवसांपासून पावसाचा जोर कायम राहिला आहे. त्यामुळे पडझडीच्या अनेक घटना घडत आहेत. सोमवारी रात्री धारावीतील पत्रा चाळ, लक्ष्मी बंगला परिसरात भिंत बांधण्याचे काम सुरू होते. काम सुरू असताना भिंतीचा काही भाग कोसळला. या घटनेत मनप्रीत सिंग (5), कियाश पटवाल (9) व अनिता सिंग (28) हे तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर शीव रुग्णालयात उपचार सुरू आहेत.