
धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाखाली मुंबईतील सरकारी आणि महापालिलेकेचे भूखंड हडपण्याच्या मिंधे सरकारच्या कारस्थानाला उलथून पाडण्यासाठी स्थापन करण्यात आलेली मुंबई बचाव समिती लवकरच मंत्रालयावर पूर्ण ताकदीशी धडक देणार आहे. या संदर्भात आज कुर्ला येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत उपस्थित राहून मान्यवरांनी सरकारविरोधात एल्गार केला.
धारावीसह मुंबई हडपण्याच्या मिंधे सरकार आणि अदानीच्या कारस्थानाविरोधात स्थापन करण्यात आलेल्या मुंबई बचाव समितीला आता सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे. आज झालेल्या बैठकीत मंत्रालयावर काढण्यात येणाऱया मोर्चासंदर्भात चर्चा झाली असून त्या आधी सर्व राजकीय पक्षांच्या अध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी यांची भेट घेऊन या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन करण्याबाबत चर्चा झाली. बैठकीला माजी आमदार बाबुराव माने, अॅड. संदीप कटके, नरसूल हक, किरण पेहलवान, भरत सोनी, अजित पाटील, मोहन मेनन, गंगाधर तुळसणकर, अमोल गुप्ते, अॅड. सागर देवरे आदी उपस्थित होते. त्याचबरोबर ज्येष्ठ कामगार नेते राजन राजे, विश्वास उदगी, शिवसेना पदाधिकारी भाऊ कोरगावकर यांनीसुद्धा बैठकीला उपस्थित राहून पाठिंबा दर्शवला.